लाचप्रकरणी अटकेत असलेल्या तहसीलदाराचा तुरुंगात मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

लाचेच्या 2 प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचा तुरुंगामध्ये मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ई.बी.नागराजू असं या तहसीलदाराचे नाव आहे. हैदराबादमधील चंचलागुडा तुरुंगामध्ये या तहसीलदाराचा मृतदेह सापडला. छताला लटकलेल्या अवस्थेत नागराजू हे पोलिसांना आढळून आले होते. ही आत्महत्या आहे की हत्या, यावरून हैदराबादमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. नागराजू यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्यांचा मृत्यू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दबावामुळे झाला आहे.

थंडीच्या काळात कोरोनाचा धोका वाढणार; सुपर कॉम्प्यूटरचा इशारा

14 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागराजू यांना अटक केली होती. त्याच्याव्यतिरिक्त एका सहाय्यक अधिकाऱ्याला आणि 2 बांधकाम व्यावसायिकांनाही अटक करण्यात आली होती. या बांधकाम व्यावसायिकांकडे 1.1 कोटींची रोकड सापडली होती जी नागराजू यांना देण्यासाठी आणण्यात आली होती असा संशय पोलिसांना आहे. मेदाचल जिल्ह्यातील रामपल्ली गावात असलेली 39 गुंठे वादग्रस्त जमीन आपल्या नावावर करण्यासाठी हे बांधकाम व्यावसायिक नागराजू यांना लाच देण्यासाठी जात होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. नागराजू यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली ज्यामध्ये काळाले की 24 एकर जमिनीसाठी नागराजू यांनी 4 जणांना परवानगी दिली होती. या जमिनीची किंमत ही 48 कोटींच्या घरात आहे. नागराजू यांनी हा निर्णय बेकायदेशीररित्या घेतल्याचं खात्यांतर्गत चौकशीत उघड झालं होतं. 25 सप्टेंबरला नागराजू यांच्यासंदर्भातील चौकशी अहवाल सादर करण्यात आला होता.

जाळणाऱ्या प्रियकराला महिलेने मिठी मारली, दोघांचा मृत्यू

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच नागराजू यांची दुसऱ्या एका प्रकरणात कोठडी मागितली होती. मंगळवारी ही कोठडी मिळाल्याने पोलिसांनी नागराजू यांना चंचलगुडा तुरुंगात आणले होते. हैदराबादमध्ये पोलीस अधिकारी नरसिम्हा रेड्डी यांच्या लाचखोर प्रकरणांमुळे खळबळ उडालेली आहे. या प्रकरणामध्ये बडे अधिकारी आणि राजकारणी मंडळी सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. यामध्ये देखील नागराजू यांचा हात असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. रेड्डी प्रकरणातील 4 आरोपींसह नागराजू यांचा कोठडीत ठेवण्यात आलं होतं. पहाटे 1.30 च्या सुमारास नागराजू यांनी त्यांच्या कोठडीतील आरोपींना ‘पेन’ आहे का असं विचारलं होतं, यावर त्यांनी नाही असं सांगून झोप आता म्हटलं होतं. पहाटे 4.40 च्या सुमारास पोलीस अधिकारी आणि वॉर्डन गस्त घालत असताना त्यांना नागराजू यांनी टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावल्याचे दिसून आले. पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले की नागराजू यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. त्यांनी चौकशीदरम्यान आपले सहकारी सहकार्य करत नसून भेटायलाही येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. नागराजू यांनी या घोटाळ्यामध्ये त्यांच्या वरिष्ठांचा हात आहे की नाही याबाबत काहीही माहिती दिली नव्हती.