‘केईएम’ दुर्घटनेला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन; शिव आरोग्य सेनेचा इशारा

मुंबई महापालिकेच्या परळ येथील ‘केईएम’ रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुमारे दोन महिन्यांच्या बाळाचा हात कापावा लागल्याचा आरोप बाळाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. यामुळे पालिकेच्या रुग्णालयाची मोठी बदनामी होत असून रुग्णालयाच्या प्रतिष्ठsला धक्का लागत आहे. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱयांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिव आरोग्य सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

‘केईएम’ रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळाने डीन डॉ. संगीता रावत यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संघटनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, जिल्हा समन्वयक सचिव ज्योती भोसले, सुप्रिया ठोंबरे-पाटणे, मुंबई पूर्व उपनगर सहसमन्वयक प्रकाश वाणी, समन्वयक सचिव शिवाजी झोरे, विनायक कानसकर, सुप्रिया बांगलेकर, साक्षी पाटील, नंदकुमार बागवे, राजाराम झगडे आदी उपस्थित होते.