
अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्दीकीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालिबानने दुख व्यक्त केले असून यात आपला काहीच हात नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे
दानिश सिद्धीकी हे रॉयटर्सचे हिंदुस्थानातील मुख्य छायाचित्रकार होते. अफगाणमधील रक्तरंजित संघर्ष पुन्हा भडकला आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तांकन करण्यासाठी दानिश सिद्धीकी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाण लष्कराच्या तुकडीसोबत कंदहारमधील स्पिक बोल्डक परिसरात फोटो काढण्यासाठी गेले होते. यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर आणि तालिबान्यांमध्ये चकमक झडली. तालिबान्यांनी रॉकेट लाँचरने केलेल्या हल्ल्यात दानिश सिद्धीकी यांचा मृत्यू झाला होता.
सिद्धीकी यांचे पार्थिव शुक्रवारी इंटरनॅशनल कमेटी ऑफ द रेड क्रॉसकडे सोपवण्यात आला. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद म्हणाला की, हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्धिकीच्या मृत्यूप्रकरणी आम्हाला खेद आहे. आम्हाला कुठलीही माहिती न देता अनेक पत्रकार युद्धभुमीवर वार्तांकन करत आहेत. सिद्धिकीच्या मृत्यूला आम्ही जवाबदार नसून पत्रकारांनी युध्दभुमीवर येण्यापूर्वी आम्हाला सूचना द्यावी आम्ही तशी खबदारी घेऊन असेही मुजाहिदने म्हटले आहे.





























































