प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण वाढ आहे. रविवारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एका वेबसिरीजचे शूटींग करत असताना तिला लागण झाल्याचे समजते. सध्या तिच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

tamannah-bhatia-news-photo

काही दिवसांपूर्वी तमन्नाचे आई वडिल कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यानंतर तिने सोशल मीडियावरून तिचे आई वडिल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने स्वत:ला देखील क्वारंटाईन केलेलं. मात्र तिची टेस्ट निगेट्विह आली होती. क्वारंटाईन संपल्यानंतर तमन्ना शूटींगवर रुजू झाली होती. या दरम्यान ती एका वेब सिरीजच्या शूटींगमध्ये बिझी होती. मात्र शूटींगदरम्यान तिला कोरोनाची लक्षण आढळून आल्यानंतर तिने स्वत:ला क्वारंटाईन केलं व चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.