सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिद्ध विनोदी तमिळ अभिनेते विवेक यांचे वयाच्या 59 वर्षी निधन झाले आहे. गुरूवारी रात्री छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेते विवेक यांनी अनेक तमिळ चित्रपटात भुमिका बजावली होती. विवेक फक्त अभिनेतेच नाही तर पार्श्वगायक आणि सामाजिक कार्यकर्तेही होते. 2009 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.

गुरूवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे 4.35 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. संगीतकार ए आर रेहमान यांनी ट्विट करून विवेक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या