बॉलिवूडमध्ये हंगामा होणार, नानांनंतर तनुश्रीचा बिग बींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. दहा वर्षानंतर मौन सोडलेल्या तनुश्रीने एकामागोमाग एक फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना निशाणा बनवले आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या गैरवर्तनाचा आरोप लगावला आहे, तसेच नाना पाटेकर यांच्यासोबत काम करणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यावरही आसूड ओढत आहे. आता यात आणखी एक नाव जोडले गेले असून ते दुसरे तिसरे कोणाचे नसून बॉलिवूडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचे आहे.

तनुश्रीवरील हल्ल्याच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागील सत्य, वाचा सविस्तर…
मला कपडे काढून नाचायला सांगितले, नानांनंतर तनुश्रीचा ‘यांच्या’वर आरोप

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लगावल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहे. काही लोक तनुश्रीच्या आरोपांची चौकशी करण्यास सांगत आहे तर काही नानांना पाठिंबा देत आहेत. अशातच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी अमिताभ बच्चन यांना तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणावर मत विचारले होते. यावेळी बिग बी यांनी मी नाना पाटेकर नाही आणि तनुश्री दत्ताही नाही, त्यामुळे मी या प्रश्नाचे उत्तर कसे देऊ? असे म्हणत आपली प्रतिक्रिया देणे टाळले होते. बिग बींच्या या कृतिवर आता तनुश्रीने उत्तर दिले आहे.

माफी माग…! नाना पाटेकर यांची तनुश्रीला कायदेशीर नोटीस
अखेर नाना पाटेकर बोलले, अभिनेत्री तनुश्रीने केला होता गैरवर्तनाचा आरोप

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तनुश्री म्हणाली की, ‘बिग बी यांचे उत्तर ऐकून मला अतिव दु:ख झाले आहे. चित्रपट नगरीमध्ये काही अशी लोकं आहे जी सामाजिक मुद्द्यांना घेऊन चित्रपट करत असतात. परंतु अशा चुकीच्या मुद्द्यांवर, गोष्टींविरोधात बोलण्याची संधी मिळते तेव्हा ते असे वक्तव्य करतात की ज्याचा काहीही अर्थ निघत नाही.’

तनुश्री म्हणते स्टारकिड असते तर सगळ्यांनी पाठिंबा दिला असता!
तनुश्रीच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी- आमीर खान

याआधी या प्रकरणी आमिर खान याला विचारण्यात आले तेव्हा त्याने, जर खरंच असे असेल तर याची चौकशी केली जावी अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच ट्विंकल खन्ना, प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, सोनम कपूर, ऋचा चड्ढा, परिणीति चोप्रा, फरहान अख्तर हे स्टार्स तनुश्रीचे समर्थन करताना दिसून आले.

‘या’ अभिनेत्रीने तनुश्री दत्ताला दिला पाठिंबा