झायरा वसीमचा निर्णय म्हणजे मुर्खपणा, तस्लिमा नसरीन यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला आहे. तसेच आपण अल्लाहच्या मार्गावरून भरकटलो असेही झायराने म्हटले आहे. यावर लेखिका तस्लिमा नसरी यांनी जोरदार आक्षेप घेत झायराचा निर्णय हा मुर्खपणा असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक मुस्लिमांची प्रतिभा ही आता बुरख्याआड जाणार असेही नसरीन यांनी म्हटले आहे.

नसरीन म्हणाल्या की, “झायरा वसीम या बॉलिवूडच्या टॅलेंटेड मुलीने अभियन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तिला वाटतं की यामुळे तिचा अल्लाहवरची श्रद्धा संपुष्टात येईल. हा निर्णय अतिशय मुर्खपणाचा आहे. मुस्लिम समाच्या किती प्रतिभावान मुली बुर्ख्याच्या अंधारात लपण्यासाठी प्रवृत्त आहेत.”

कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी झायराच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच हिंदुस्थानच्या प्रशासनिक नोकरी सोडून राजकारणात उतरलेले शाह फैसल यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहेत.