
आजपर्यंत तुम्ही टीव्हीचा वापर चित्रपट, मालिका, बातम्या पाहण्यासाठी केला असेल, तसेच मोबाईलशी जोडून त्यावर वेबसिरीज, क्रिकेटचे सामनेही पाहिले असतील मात्र आता मोबाईलप्रमाणेच तुम्हाला टीव्हीवरूनही व्हिडीओ कॉल करता येणार आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा देशातील पहिला अँड्रॉइड टीव्ही पी 725 लॉन्च केला आहे.
पी 725 हा पहिला 4के एचडीआर टीव्ही असून तो अँड्रॉइड 11 वर चालतो. तसेच यात व्हिडिओ कॉलची सुविधा असून डॉल्बी व्हिजनचे अल्ट्रा व्हिव्हिड कलर्स एमईएमसी, डॉल्बी व्हिजन व अॅटमॉस, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल 2.0, स्पीड आणि सिक्युरिटी अपडेट्स इत्यादी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या टीव्हीत 7000+ अॅप्स आणि 7,00,000+ शो/ फिल्म एकाचवेळी अॅक्सेस करता येणार आहे.
चुंबकाने जोडलेला व्हिडीओ कॉल कॅमेरा आपल्याला सहजपणे प्लग इन आणि प्ले करता येतो. गूगल ड्युओचा वापर करून मित्र व कुटुंबासह व्हिडीओ चॅट करण्यासह, ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होणे, घरूनच आरामात ऑफिससोबत कनेक्ट होणे सहज शक्य होते.

पी 725 चे डॉल्बी व्हिजन हे आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून ते अविश्वसनीय ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर आणि डिटेलसह अल्ट्रा-व्हिव्हिड पिक्चर क्वालिटी प्रदान करण्यासाठी वाइड कलर गॅमट क्षमतांसह हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) ला जोडते. डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले अधिक व्हिव्हिड, वास्तविक पिक्चर दाखवतो. शार्प कॉन्ट्रास्ट, ट्रू ब्लॅक व शॅडो डिटेल्सची संगती सखोल दिसून येते.
किंमत –
दरम्यान, अॅमेझॉनवर हा टीव्ही 43″,50″, 55″ आणि 65″ असा चार प्रकारामध्ये उपलब्ध असून याची किंमत अनुक्रमे 41 हजार 990, 56 हजार 990, 62 हजार 990 आणि 89 हजार 990 रुपये एवढी आहे.




























































