
सामना ऑनलाईन | पनवेल
पनवेलमध्ये वर्गात मस्ती केली म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला भर वर्गात पॅन्ट काढायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुक्यातल्या कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेतील हा धक्कादायक प्रकार असून, या प्रकरणी शाळेतील एका शिक्षिकेला अटक करण्यात आले आहे.
>सेंट जोसेफ शाळेतील पूजा नावाच्या शिक्षिकेने पहिलीच्या विद्यार्थ्याला वर्गात, मस्ती केली म्हणून वर्गात सर्व मुलांसमोर या मुलाला पॅन्ट उतरवायला लावून अंडर वेअरवरच उभे केले होते. संतप्त पालकांनी याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात केली तक्रार केली आहे.
दरम्यान, आरोपी शिक्षिकेला कळंबोली पोलिसांनी अटक केली असून नंतर तिची १५ हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे. सेंट जोसेफ संस्था ही नेहमीच वेगवेगळ्या कारणावरून सतत चर्चेत आहे. अगोदर पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत फी भरली नाही म्हणून विध्यार्थ्यांना कोंडून ठेवले होते.































































