शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांवर कारवाईचं सत्र, पॅरिसमधील मशीद बंद केली

काही दिवसांपूर्वी पैगंबरांचं व्यंगचित्र काढण्यावरून एका शिक्षकाची हत्या झाली होती. या हत्येनंतर फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

शिक्षकाच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों यांनी या हत्येची निंदा करून याला इस्लामिक दहशतवाद म्हटलं होतं. अशा प्रकारे दहशत पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता.

त्यानुसार फ्रान्स सरकारने या हत्येनंनतर इस्लामी कट्टरपंथीयांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. यात अनेक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी तब्बल 120 संस्था आणि संघटनांचा तपास करण्यात आला आहे. या 120 संस्था-संघटनांवर कट्टरपंथीयांच्या विचारधारेचा प्रसार केल्याचा संशय आहे.

या कारवाईअंतर्गत पॅरिसच्या ईशान्येला असलेल्या एका मशिदीवर कारवाई करण्यात आली आहे. फ्रान्स सरकारने इस्लामिक आंदोलनात सहभागी असल्याच्या आरोपाखाली या मशिदीला बंद केलं आहे.

काय आहे प्रकरण-

16 ऑक्टोबर रोजी पॅरिस येथील एका शाळेत इतिहासाच्या शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे याच शाळेत शिकणाऱ्या एका मुलाचा पिता असलेला आरोपी व्यथित झाला होता आणि संतापाच्या भरात त्याने चाकू घेऊन शिक्षकाला गाठले आणि शीर कलम केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथून 600 मीटर अंतरावर पोलिसांनी आरोपीचा गोळ्या घालून खात्मा केला.

या घटनेनंतर मॅक्रों यांनी केलेल्या इस्लामिक दहशतवादाच्या विधानावर इस्लामी देशांकडून निषेध करण्यात येत आहे. सौदी अरेबियासह अनेक देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांच्या आयात आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या