अन् व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहली भडकला, एक दिवस असा येईल…

1431

मैदानावर आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला कर्णधार विराट कोहली व्यस्त वेळापत्रकामुळे भडकला आहे. सध्या हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून उद्यापासून (शुक्रवार) पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विराटने व्यस्त कार्यक्रमांवर आपले मत व्यक्त केले. एक दिवस असा येईल की क्रिकेटर सराव न करता मैदानात उतरतील, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विराटने दिली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 सामन्याची मालिका खेळली, यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली. ही मालिका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंना सहा आठवड्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याला रवाना व्हावे लागले. या दौऱ्यामध्ये हिंदुस्थानचा संघ पाच टी-20 लढती, तीन एक दिवसीय लढती आणि दोन कसोटी लढती खेळणार आहे. एकापाठोपाठ होणाऱ्या या दौऱ्यांमुळे विराट भडकला आहे.

दिल्लीवर मुंबई भारी, टीम इंडियाच्या संघात एकाचवेळी पाच ‘मुंबईकर’

आता आम्ही अशा स्थितीमध्ये पोहोचलो आहे की थेट मैदानात खेळण्यासाठी उतरावे लागेल. क्रिकेटचे वेळापत्रक खूपच व्यस्त झाले आहे. एखाद्या देशातून दुसऱ्या देशात प्रवास करून थेट मैदानात उतरणे सोपे नाही, असे मत विराटने व्यक्त केले. मला विश्वास आहे की भविष्यात या गोष्टींकडे लक्ष देण्यात येईल. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच असे आहे की तुम्हाला सातत्याने खेळावे लागते, असेही विराट कोहली म्हणाला.

#INDvsNZ हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

तो पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही नुकतीच एक दिवसीय मालिका खेळली. यामुळे बराच काळा मैदानात व्यतित करता आला. त्याआधी आम्ही श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकाही खेळली. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये खेळणे जास्त अवघड जाणार नाही. तसेच इतर देशांसारखे न्यूझीलंडमध्ये खेळाडूंना डोक्यावर बसवले जात नाही, त्यामुळे येथे तुमची परीक्षा असते, असेही विराटने यावेळी सांगितले. किवी संघ प्रत्येक सामना जिंकण्याच्या उद्देषाने उतरतो, त्यामुळे इथे खेळणे आवडते. तसेच किवी खेळाडू शांत आणि व्यवसायिक क्रिकेट खेळाडू आहेत, असेही विराट कौतुकादाखल म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या