
आज क्रिकेट विश्वचषक 2023 च्या इंडियाच्या शेवटच्या सामन्यात हिंदुस्थानचा क्रिकेट संघ नेदरलँड्सचा सामना करणार आहे. टीम हिंदुस्थान दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा नेदरलँड्सवर विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान बंगळुरू येथील सांघिक हॉटेलमध्ये संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आणि मित्रांसह दिवाळी सण साजरा केला.

कर्णधार रोहित शर्माने सर्व मित्र आणि चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन स्वतःचा आणि पत्नी रितिका यांचा फोटो पोस्ट केला आहे.

स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांनीही दीपोत्सवात हजेरी लावली. शमीने पारंपारिक कुर्ता परिधान केला आणि ‘शुभेच्छा आणि यशस्वी दिवाळी’च्या शुभेच्छांसह एक फोटो पोस्ट केला.

टीम इंडियाचे इतर खेळाडू शुभमन गिल, इशान किशन, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनीही शनिवारी दिवाळी साजरी केली.

दिवाळी सेलिब्रेशनमधील टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट याची पत्नी अनुष्का शर्मासोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





























































