World cup 2019 दुसऱ्या कठीण पेपरसाठी टीम इंडिया सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

यंदाच्या 12 व्या विश्वचषकात सलामीलाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार विजय मिळविणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघ आपला दुसरा कठीण पेपर सोडविण्यासाठी मोठय़ा विश्वासाने ओव्हल मैदानावर उतरणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलामी तर छान दिली आहे, पण आता झुंज होईल ती गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाशी. पण कोणत्याही कठीण आव्हानाचा सामना करण्याची जिद्द यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जाणाऱया हिंदुस्थानी संघात ठासून भरली आहे. यंदाच्या विश्वचषकात उतरलेल्या 10 संघांत हिंदुस्थानी गोलंदाजी समतोल आणि परिपूर्ण असल्याचे क्रिकेटतज्ञांचे मत आहे. त्यामुळे रविवारची कांगारूंविरुद्धची हिंदुस्थानची लढत रोमहर्षक होणार हे निश्चित.

 बलाढय़ ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या लढतीत ‘डार्क हॉर्स’ गणल्या जाणाऱया वेस्ट इंडीजने कांगारूंना चांगलेच झुंजवले होते. अखेर ही लढत 15 धावांनी जिंकून गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. टीम इंडियाने मात्र सलग दोन पराभवांनी खचलेल्या दक्षिण आफ्रिकेला तोंडच वर काढू न देता शानदार 6 विकेटस्नी विजय मिळवला.

पाऊस वैरी होऊ नये…

लंडनच्या बेभरवशी वातावरणाचा फटका शुक्रवारी पाकिस्तान आणि श्रीलंका संघांना बसला आहे. शिवाय पावसामुळे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या उभय संघांना सरावही करायला मिळाला नसल्यामुळे रविवारी तरी पावसाने गोंधळ घालू नये अशी प्रार्थना उभय संघाचे खेळाडू व चाहते करीत आहेत.

आजची लढत

हिंदुस्थान वि. ऑस्ट्रेलिया

दि ओव्हल, लंडन, दुपारी 2.30 पासून