रोहितने मोडला 22 वर्षांपूर्वीचा विक्रम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा  सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील एक 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने एका वर्षाच्या कालावधीतला सर्वाधिक धावा करणारा सलामीचा फलंदाज होण्याचा विक्रम केला आहे. रविवारी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तिसऱया आणि निर्णायक सामन्यात रोहितने हा विक्रम केला. दुसऱया डावात 9 धावसंख्येवर पोहचताच रोहितच्या नावावर हा विक्रम झाला. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याच्या नावे हा विक्रम होता. 1997 या वर्षात त्याने 2,387 धावा कुटल्या होत्या. रोहितने या सामन्याआधी आतापर्यंत 2019 या वर्षातल्या आपल्या 2,379 धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित या वर्षात अफलातून  फॉर्ममध्ये होता. त्याने सलामीचा फलंदाज म्हणून या वर्षभरात एकूण 10 शतके झळकावली आहेत, मात्र केवळ 10 धावांनी रोहितचे दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत येण्याचे स्वप्न अखेर संपुष्टात आले आहे. रोहितने 63 चेंडूंत 63 धावा केल्या. त्याच्या या खेळीत रोहितने 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.  एका कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये दीड हजार धावा पूर्ण करणाऱया फलंदाजांच्या यादीत रोहितला स्थान मिळवता आले नाही.

मोहम्मद शमीने या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 42 बळी टिपण्याचा विक्रम केला. 2014 सालीही त्याने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 34 बळी टिपले होते. आता दुसऱयांदा तो सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज ठरला.