रोहितच्या गळ्यात पुन्हा कर्णधारपदाची माळ; इंग्लंडविरुद्ध वन डे, टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 आणि वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली आहे. गुरुवारी रात्री बीसीसीआयने दोन्ही संघांची घोषणा केली असून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे टी-20 संघामध्ये पुनरागमन झाले आहे. तसेच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याचीही लॉटरी लागली असून पहिल्या वन डे साठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीसाठी विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना संधी देण्यात आलेली नाही. हे पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्ध गेल्यावर्षी कोरोनामुळे रद्द झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम लढतीमध्ये 1 जुलैपासून मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांना आराम देण्यात आला आहे. या कसोटीमध्ये रोहित शर्मा कोरोनाची लागण झाल्यामुळे खेळू शकणार नाही. मात्र वन डे आणि टी-20 मालिकेसाठी तो उपलब्ध असेल. तसेच पहिल्या टी-20 साठी संघात स्थान देण्यात आलेल्या ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, व्यंकटेश अय्यर आणि अर्शदिप सिंह यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 साठी संघात जागा देण्यात आलेली नाही.

हार्दिकचे कमबॅक

हार्दिक पांड्या याचे तब्बल एका वर्षाने टीम इंडियाच्या वन डे संघामध्ये कमबॅक झाले आहे. जुलै 2021 मध्ये पांड्याने आपला अखेरचा वन डे सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. नुकत्यात आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत पांड्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला.

पहिल्या टी-20 साठी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 साठी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

वन डे मालिकेसाठी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.