बहुचर्चित ‘ये रे ये रे पैसा 2’चा टीजर सोशल मीडियावर लाँच

47


सामना ऑनलाईन । मुंबई

‘अण्णा परत येतोय’ अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या ‘ये रे ये रे पैसा 2’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. गुंतवून ठेवणारं कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाला ‘ये रे ये रे पैसा 2’ च्या रुपात पुढे नेलं आहे.

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अण्णा परत आल्याने आता काय धमाल उडणार याचं उत्तर चित्रपटातच मिळेल. येत्या 9 ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या