
सामना ऑनलाईन, मुंबई
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. Saamana Online ला काही प्रवाशांनी फोन करून गाड्या उशिराने धावत असल्याबद्दलची माहिती दिली. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली असता माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने अप दिशेच्या धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्याचं या प्रवाशांनी सांगितले आहे.
Due to technical failure near Mahim station, all UP through & DOWN Through trains will be running late by about 15-20 minutes. Inconvenience is deeply regretted. @WesternRly
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) March 8, 2019
Western Railway: Due to technical failure near Mahim railway station, all UP through & DOWN through trains will be running late today by about 15-20 minutes. #Mumbai pic.twitter.com/vlnBIAc2rX
— ANI (@ANI) March 8, 2019
6:57am borivli to curchgate fast local is very very slow today …@WesternRly @localtrain pic.twitter.com/Am0mRxBzSp
— Akshay Naikdhure (@NaikdhureAkshay) March 8, 2019
या तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरील लोकल गाड्या, स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे अप दिशेकडील धीम्या मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेने देखील याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्येही इंजिन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम मार्गावरील सर्व गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
Due to technical fault at Mahim railway station all local train’s running late by 20 to 30 minutes#mumbailocal @MarathiBrain @MarathiRT @iamamumbaikar
— महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना (@maharailpass) March 8, 2019


























































