WhatsApp मध्ये येत आहे ‘हे’ नवीन फिचर; आता जुने मेसेज शोधणे होईल सोपे

6005

व्हॉट्सअ‍ॅप मध्ये आता एक नवीन फिचर येणार आहे. हे फिचर आल्यानंतर वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये कोणतेही मेसेज सहज शोधता येतील. या फीचरची सध्या चाचणी सुरु असून व्हॉट्सअ‍ॅप हे लवकरच लॉन्च करू शकते. या फीचरचे काही फोटोही समोर आले आहेत. हे फोटो WABetainfo ने जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच Search By Date हे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. हे फिचर आल्यानंतर वापरकर्त्यांना कोणतेही मेसेज शोधताना फारसा त्रास होणार नाही. कारण तारीख निवडल्यानंतर वापरकर्त्याला त्याचे जुने मेसेज पाहता येणार आहे. मात्र हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप कधी लॉन्च करणार याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही आहे. कंपनी हे फिचर आधी आयफोनसाठी लॉन्च करू शकते.

असे करेल काम

Search By Date या फिचर बद्दल बोलायचे झाले तर वापरकर्त्यांना हे अगदी सोप्या पद्धतीने वापरता येईल. सध्या मेसेज शोधण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या सर्च पर्यायावर जावे लागते. तिथे मेसेज शोधण्यासाठी तुम्हाला मेसेज करणाऱ्याचे नाव लिहून ते सर्च करावं लागत. मात्र नवीन फीचरमध्ये वापरकर्ते कोणतीही निश्चित तारीख निवडून आपल्याला हवे असलेले मेसेज शोधू शकतील. हे फिचर आल्यानंतर वापरकर्त्यास चॅट बॉक्समध्ये एक कॅलेंडर चिन्ह दिसेल. याला क्लिक करताच महिना व वर्षाचा पर्याय उपलब्ध असेल. याद्वारे वापरकर्ते मेसेज सर्च करू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या