
मराठी मालिकांमधून संस्कारी सुनेची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानने तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटात अगदी बोल्ड अवतार दाखवला आहे. हिंदीतल्या पदार्पणाच्या चित्रपटातच तेजश्रीने किसिंग सिन दिला आहे. तिच्या या आगामी बबलू बॅचलर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात ती अभिनेता शर्मन जोशीसोबत किस करताना दिसत आहे. तिच्या या किसची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
बबलू बॅचलर’ या सिनेमातू तेजश्री बॉलिवूड पदार्पण करत असून अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पूजा चोप्रा ही अभिनेत्री देखील दिसणार आहे. तेजश्रीने बबलू बॅचलर या तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. तेव्हापासून चाहत्यांमध्ये तिच्याय या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. हा चित्रपट येत्या 20 मार्च 2020 ला रिलीज होणार आहे.
तेजश्रीने होणार सून मी या घरची या झी मराठीवरील मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती ‘ती सध्या काय करते’ या गाजलेल्या चित्रपटात तसेच ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकात दिसली होती. सध्या ती प्रेक्षकांना ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.




























































