कोरोनायोद्धा डॉक्टरांना अनोखा सलाम, तेजस्विनी पंडितचे नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट

कोरोनाच्या संकटात देशभरातील मंदिरे बंद असून साक्षात देवच डॉक्टरांच्या रूपाने मदतीला धावून जात आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱया डॉक्टरांना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीनिमित्त खास फोटो शूटच्या माध्यमातून सलाम केला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घालून रुग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे.

‘दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती
स्थेतोस्कोप धरला घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस,
आईच उभी आहे पीपीई किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस,
विसर त्याचा पाडू नकोस’,
अशी पोस्ट तेजस्विनीने शेअर केली आहे. फोटोशूटविषयी ती म्हणाली, ‘रुग्णांचे प्राण वाचवणं ही विज्ञानाने डॉक्टरांना दिलेली ‘दैवी’ देणगी आहे. कोणत्याही संकटकाळी आपण देवाचा धावा करतो. आणि पहा ना कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी कसे देवासारखे धावून आले. आपली वैयक्तिक सुखदुःख विसरून अहोरात्र रुग्णसेवा करणाऱया डॉक्टरांमधल्या दैवी कर्माला या फोटोद्वारे केलेला हा सलाम आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या