
वेतनवाढ, सुरक्षित नोकरी, थकित रक्कम अदा करणे अशा विविध मागण्यासांठी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाचे 50 हजार कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. त्यामुळे राज्यातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
#Hyderabad: Telangana State Road Transport Corporation (TSRTC) employees go on indefinite strike over their demand for the merger of the TSRTC with the government. pic.twitter.com/5wGHIgkFBD
— ANI (@ANI) October 5, 2019
तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. परिवहन विभागाला सरकारी सेवेत विलीन करणे, सुरक्षित नोकरी, पगारवाढ, थकित पगार अदा करणे अशा मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाची पूर्वसूचना फार आधीच सरकारला देण्यात आली होती. मात्र, सरकारने त्यावर कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत, असा संपकरी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.



























































