सांगोल्यात टेंभूचा कालवा फुटला लाखो लिटर पाणी वाया; शेतकऱयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रूक येथे मध्यरात्री टेंभू योजनेचा कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच कालव्यातून वाहणारे पाणी शेतकऱयांच्या शेतात घुसल्यामुळे लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. या पाण्याने डाळिंब, बाजरी, मका पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कालवा फुटल्याचा आरोप करीत शेतकऱयांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

टेंभू कालवा फुटल्याने शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान झाले असून, उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. डाळिंब, बाजरी व मका पिकाला जबर फटका बसला आहे. एकीकडे पाण्यासाठी लढा सुरू असताना टेंभूचाच कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने शेतकऱयांतून संताप व्यक्त केला जात आहे. सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथून कवठेमहांकाळकडे जाणारा टेंभूचा कालवा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱयांच्या शेतामध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. डाळिंब, बाजरी व मक्याचे नुकसान झाल्याने शेतकऱयांनी संताप व्यक्त केला.

दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

ह या कॅनॉलला अनेक ठिकाणी गळती सुरू होती. यासंबंधी शेतकऱयांनी टेंभू कालवा प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन दुरुस्तीची मागणी केली होती; परंतु अधिकारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱयांना नुकसान सोसावे लागले. सांगोल्यात टेंभू कालव्यातून पाणी मिळावे म्हणून आंदोलन सुरू असताना टेंभूचाच कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे शेतीचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱयांनी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.