
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रेल्वे स्टेशनवर हरवलेल्या मुलांसाठी रेल्वे आता रेल्वे स्टेशनच्या परिसरात घरे उभारणार आहे. अल्पकाळाच्या वास्तव्यासाठी असणारी ही घरे प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली, गुवाहाटी, दानापूर, समस्तीपूर आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांवर हरवलेल्या मुलांसाठी उभारली जाणार आहेत. रेल्वे स्टेशनच्या हद्दीत हरवलेल्या या मुलांची त्वरित काळजी घेतली जावी, त्यांचे संरक्षण व्हावे हा ही निवासस्थाने उभारण्यामागे उद्देश आहे, असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.
ही घरे दोन हजार चौरस फूट आकाराची, 25 मुलांना राहता येणारी अशी असणार आहेत. मुलांना पोषण आहार, वैद्यकीय मदत, मानसिक-सामाजिक आधार मिळणार आहे. ही हरवलेली मुले त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्यांना तात्पुरता आश्रय मिळावा यासाठी बाल न्यायालय कायदा आणि ‘पोस्को’ कायद्यानुसार ही घरे उभारली जाणार आहेत.
summary- temporary shelter home for lost children




























































