
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. कुपवाड्यातील हंडवाडा येथे रविवारी रात्री सुरक्षा यंत्रणांसोबत झालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला.
हंडवाड्यात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली, त्यावेळी या दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात तो ठार झाला.
Jammu & Kashmir: 1 terrorist has been killed in forest area of Kupwara’s Handwara in an encounter with security forces which started last night pic.twitter.com/n2YvuUf66n
— ANI (@ANI) July 9, 2018
























































