पुलवामात पुन्हा मोठ्या हल्ल्याची शक्यता, जम्मू कश्मीरमध्ये हाय अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील पुलवामा येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. यावेळी दहशतवादी आयईडीसोबतच स्नाईपरचा देखील वापर करू शकतात.

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी याचा 8 जुलै 2017 रोजी खात्मा करण्यात आला होता. बुरहानच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवादी जुलै महिन्यातच मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या माहितीनंतर गुप्तचर यंत्रणांनी कश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले आठ दहशतवादी तयार असल्याचे समजते. हे दहशतवादी नाव व रुप बदलून कश्मीर खोऱ्यात राहत असल्याचे समजते.