
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाही अशीच स्थिती आहे. बुधवारी सकाळी 24 वर्षाच्या एका नागरिकाची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिंदुस्थानच्या लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्याने दहशतवाद्यांनी आता नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
#JammuAndKashmir Police: Terrorists have killed a 24-year-old civilian identified as Tanveer Ahmed from Bemnipora, Shopian. His body was found in Kachdoora. Case has been registered and an investigation has been started. pic.twitter.com/ocX4CUPL02
— ANI (@ANI) March 27, 2019
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान मधील बेमनीपोरा भागात राहणाऱ्या तन्वीर अहमद यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यांचा मृतदेह कचदूरा भागात आढळला आला. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

























































