शिक्षण सेवकासही टीईटी बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देताना सदर उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पात्र असणे बंधनकारक आहे, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

अनुकंपा तत्त्वाने शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देताना संबंधित उमेदवारास शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सवलत राहील किंवा कसे याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षक पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्राथमिक शिक्षकांची अर्हता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) निश्चित केली असून त्याचे पालन करणे आवश्यक आहे. इतर बाबींसह अनुकंपा तत्त्वावरही शिक्षकपदी नियुक्ती देताना उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे.