फेसबुकवरील मैत्री पडली अडीच कोटींना, थाय दूतावासातील व्हिसा अधिकारी ‘हायजॅक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

फेसबुकवरील अनोळखी महिलेची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणे, थाय दूतावासातील व्हिसा अधिकाऱ्याला अडीच कोटींना पडल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात समोर आला आहे. स्वप्नील धामणकर असे अधिकाऱ्याचे नाव असून मरियम खुर्शीद या अमेरिकन महिलेच्या जाळ्यात अडकून त्याने अडीच कोटी रुपये खर्ची घातले. मात्र या बदल्यात 18 लाख अमेरिकन डॉलर हातात येण्याऐवजी स्वप्नील यांच्या हातात काळे कागद आल्याने कपाळावर हात मारून घेण्याची केळ आली आहे.

कल्याण येथील खडकपाडा भागात राहणारे स्वप्नील धामणकर (35) मुंबईच्या थाय दूतावासात सीनियर व्हिसा अधिकारी म्हणून कामाला आहेत. ऑगस्ट 2017 मध्ये धामणकर पत्नी व दोन मुलांसह बँकॉक येथे थायलंडला फिरायला गेले होते. कल्याणात येताच स्वप्नील यांना मरियम खुर्शीद नामक अमेरिकन महिलेची फेसबुकवर रिक्वेस्ट आली. त्यांनी ती ऍक्सेपट करून चॅटिंगला सुरुवात केली. मरियमने माझे पती अमेरिकन सैन्यात होते. त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर माझा दीर लग्नासाठी माझ्याकर दबाव टाकत असून त्याने मला तेहरानला बोलावले आहे. मात्र मला तेहरानमध्ये न जाता हिंदुस्थानात यायचे आहे. त्यासाठी तुम्ही माझी मदत करा, अशी विनंती केली. यासोबतच माझ्या पतीने माझ्यासाठी 18 लाख डॉलर्स ठेवले आहेत. हे पैसे मला हिंदुस्थानी चलनात कव्हर्ट करून द्या, असे मरियमने सांगताच स्वप्नीलने मदत करण्याचे ठरवले.

डॉलरच्या नादात घर गहाण
मरियमने हिंदुस्थानात येत असल्याची बतावणी करून स्वप्नीलकडून आणखी एक लाख आणि याआधीही विविध बहाण्याने एकूण दोन कोटी 53 लाख उकळले. अखेर स्वप्नीलने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मरियमला मदतीच्या नादात स्वप्नीलने राहते घरही गहाण ठेवल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नायजेरियन फ्रॉडचा फास आवळला
मरियमशी चॅटिंग केल्यानंतर स्वप्नीलला ऑगस्ट 2017 मध्ये एका व्यक्तीने फोन करून कस्टम ऑफिसर असल्याचे सांगितले. तुमचे पार्सल आले आहे, ते पार्सल घेण्यासाठी कर म्हणून सहा लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे स्वप्नीलने दिले. त्याच दिवशी एका नायजेरियन व्यक्तीने स्वप्नील यांच्या घरी येऊन एक बॉक्स दिला. त्यामध्ये डॉलर्सची 16 काळी बंडले होती. स्कॅनिंगमध्ये पैसे दिसू नये म्हणून बंडले काळी केल्याचे नायजेरियन क्यक्तीने स्वप्नील यांना सांगून हे काढण्यासाठी 40 लाखांचे एक लिटर केमिकल व पावडर दिली. पुढे काळी बंडले पूर्वकत करण्यासाठी मरियमने पाठवलेल्या टेशनने 42 लाख रुपये घेत पाच नोटांचा रंग काढून उर्वरित नोटा स्वप्नील यांना धुण्यास सांगितले. मात्र टेक्निशन गेल्यानंतर नोटांचा रंग बदलत नसल्याने स्वप्नील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.