
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्या तब्बल 62 वर्षांच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता मिळवली आहे. बुधवारी झालेल्या नाट्यमय विश्वासदर्शक ठरावात विजय सरकारला बहुमत मिळाल्याने त्यांची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत निवड निश्चित झाली आहे.
विश्वासदर्शक ठरावावेळी विजय यांच्या बाजूने 144 आमदारांनी मतदान केले, तर विरोधात 22 मते पडली. पाच आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. या मतदानापूर्वी द्रमुक पक्षाच्या 59 आमदारांनी सभात्याग केलाय तर अण्णाद्रमुक पक्षाने आपल्या आमदारांना विजय सरकारविरोधात मतदान करण्याचे निर्देश दिले होते. असे असताना द्रमुकच्या 24 आमदारांनी विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे.
VIDEO | Chennai, Tamil Nadu: “TVK-led govt concentrates on people’s welfare, social justice, not power,” says Chief Minister C Joseph Vijay as he thanks everyone for proving floor test and securing trust votes of 144 MLAs.
Source: Third Party
(Full video available on PTI… pic.twitter.com/oplbhqxioj
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2026
मात्र, विश्वासदर्शक ठरावापेक्षा अण्णाद्रमुकमधील अंतर्गत फूट ही अधिक चर्चेची बाब ठरली. अण्णाद्रमुकमधील तब्बल 24 आमदारांनी पक्षप्रमुख पलानीस्वामी यांच्या आदेशाला धाब्यावर बसवत विजय यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यापासूनच अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्ष आणि नेतृत्वावरून मतभेद उघडपणे समोर येऊ लागले होते. सलग चौथ्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष नेतृत्व संकटात सापडल्याची चर्चा सुरू आहे. सी.व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील गटाने पुद्दुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये तळ ठोकला होता. या गटाने पलानीस्वामी यांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने सार्वजनिकरीत्या ही मागणी फेटाळून लावत “पक्षात सर्व काही सुरळीत आहे” असा दावा केला. पलानीस्वामी समर्थकांनी रिसॉर्टमध्ये आमदार ठेवण्यामागे टीव्हीकडून ‘फोडाफोडी’चा धोका असल्याचे कारण दिले होते.
पण आज बहुमत चाचणीच्या वेळी अण्णा द्रमुकच्या 24 आमदारांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिल्याने अण्णाद्रमुकच्या पक्षातील फूट समोर आली आहे.




























































