
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रेषा व शब्दांच्या फटकाऱ्याने भल्याभल्यांना गारद केले. त्यांनी काढलेली व्यंगचित्रे म्हणजे महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहास. या रेषांची व रंगांची जादू अनुभवण्याची संधी ठाणेकरांना पुन्हा मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये जणू ‘कलानगरी’ अवतरली असून आज या स्मारकाचे असंख्य कलाकारांच्या साक्षीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
तीन हात नाका येथील इटर्निटी मॉलशेजारी हे भव्य स्मारक ठाणे महानगरपालिकेने उभारले आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून तीन मजली भव्य इमारत उभारली असून त्यासाठी 30 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तळमजल्यावर प्रदर्शन कक्ष, प्रशासकीय कार्यालय, शिल्पकला दालन, उपाहारगृह उभारले आहे. पहिल्या मजल्यावर मुद्रणदालन, व्यंगचित्रे/जीवनचरित्र दालन, चित्रकला प्रदर्शन, दृकश्राव्य कक्ष असून दुसऱया मजल्यावर विश्रांती कक्ष, ग्रंथालय, भांडारगृह अशा सुविधा आहेत. याच ठिकाणी उभारलेल्या दुसऱया इमारतीत योग कक्ष, प्रकाश व ध्वनिप्रदर्शन, कलाप्रदर्शन भरवण्यात आले आहे.
ठाण्यातील कलाकार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळे नाते होते. हे नाते या स्मारकामुळे आणखी दृढ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पणानंतर संपूर्ण स्मारकाची पाहणी केली. तसेच या भव्य वास्तूचे व विविध कलाप्रकारांचे कौतुक केले. या स्मारकातील प्रदर्शनात शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील विविध क्षणांची टिपलेली छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांचा राजकीय व सामाजिक जीवनपटच उलगडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दालनाला आवर्जून भेट दिली. एवढेच नव्हे तर त्यातील अनेक प्रसंग ते स्वतः समजावून सांगत होते. ही छायाचित्रे पाहून मुख्यमंत्री स्वतःआठवणीत रमले. हे स्मारक म्हणजे माहेरघर ठरेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना चांदीची तलवार भेट दिली.
शेवटची सभा आणि ‘ती’ खुर्ची
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात अनेक जाहीर सभा घेतल्या. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानेच दिली. 2012 साली झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांची भव्य जाहीर सभा सेंट्रल मैदानावर झाली होती. ही सभा त्यांची अखेरची ठरली. यावेळी व्यासपीठावर ज्या पांढऱया शुभ्र खुर्चीत शिवसेनाप्रमुख विराजमान झाले होते ‘ती’ खुर्ची स्मारकाच्या मुख्य सभागृहात दर्शनी भागामध्येच ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बराच वेळ या खुर्चीजवळ थांबले. शिवसेनाप्रमुखांची खुर्ची आणि त्यावर ठेवलेली चाफ्याची फुले.. हा भावनिक क्षण अनुभवण्यासाठी छायाचित्रकारांनी प्रचंड गर्दी केली होती. या ऐतिहासिक खुर्चीचा अनमोल ठेवा स्मारकात कायमचा जपून ठेवण्यात येणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांचा आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिकली पालिका मुख्यालयात किकासकामांचा आढाका घेतला. किकासकामांची सद्यस्थिती, होऊ घातलेली कामे, मंजुरीच्या टप्प्याकर असणारी कामे याबाबत जकळपास अडीच तास मुख्यमंत्र्यांनी सर्क तपशील समजून घेतले. यानंतर त्यांनी कल्याण-डोंबिकलीचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी सर्कांनी योगदान देण्याचे आकाहन केले. याचकेळी शासन पूर्ण ताकदीने कल्याण-डोंबिकलीकरांच्या पाठीशी राहील, अशी ग्काही देताना शंभर कोटींच्या निधीची घोषणा केली. प्राधान्यक्रम ठरकून तत्काळ याबाबतचा प्रस्ताक पाठकण्याचे आदेश त्यांनी आयुक्त गोकिंद बोडके यांना दिले.
अमिताभ बच्चन, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, शरद पवार आणि सुधीर फडके
बाळ मुणगेकर यांनी शिवसैनिकांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या कॅमेऱयात क्लिक केले. त्यातील निवडक 180 छायाचित्रे या स्मारकामध्ये लावण्यात आली आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबतची अनेक छायाचित्रे त्यात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्यासोबतचे अनेक प्रसंग छायाचित्रांमध्ये असून स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक छायाचित्र मोठय़ा आत्मियतेने बघितले.
बाळासाहेबांचे शिल्प, चित्रे व व्यंगचित्रे
स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोकळ्या जागेत जणू विविध कलांचा संगम झाला होता. महेश अंजर्लेकर यांनी बाळासाहेबांचे हुबेहूब शिल्प साकारले. तर जय सालीयन, विजय बोधनकर यांनीदेखील शिवसेनाप्रमुखांचे ऑन दी स्पॉट चित्र रेखाटले. प्रकाश बाळ जोशी, चंद्रकांत चन्ने, अश्विन शिंदे, ज्वालाप्रसाद विश्वकर्मा या कलाकारांनीही व्यंगचित्रे तसेच चित्रे काढून उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारकाचे लोकार्पण केल्यानंतर कलाकारांच्या दालनाला आवर्जून भेट दिली. तसेच या कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. बाळासाहेबांची चित्रे, शिल्प, व्यंगचित्रे बघून उद्धव ठाकरेही भारावून गेले. कलाप्रेमी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कलाकृतींचे मनसोक्त कौतुक केल्याचे बघून कलाकारांच्या चेहऱयावर आनंदाचे भाव दिसत होते.
कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी १०० कोटी
कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी तातडीचा निधी म्हणून शंभर कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शंभर कोटींच्या निधीतून शहर स्वच्छता, रस्त्यांची कामे, पदपथ दुरुस्ती याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. रस्त्यातील अतिक्रमणे काढणे, भंगार गाड्या हटवणे, पेâरीवाल्यांना शिस्त आणि डिव्हायडर सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे.

































































