ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे वृंदावन, राबोडी, श्रीरंग विभागाचे विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर आज सायंकाळी ठाण्यातील श्रीरंग येथील शिवसेना शाखेत दोघा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर आज जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी जयस्वाल यांचा वाढदिवस होता. त्याच्या शुभेच्छा देण्याचे निमित्त साधून दोन हल्लेखोर आज शिवसेनेच्या श्रीरंग येथील शाखेत आले. यावेळी धारदार शस्त्रांनी या दोघांनी जयस्वाल यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयस्वाल यांना तातडीने ठाण्याच्या दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डोक्याला, कानाला व पायाला यामध्ये गंभीर दुखापत झाल्याची माहिती उपविभागप्रमुख राजेश तावडे यांनी दिली. दरम्यान, शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.