कुत्रीसोबत सेक्स करणाऱ्या विकृताला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

प्रातिनिधिक छायाचित्र

एका विकृत तरुणाला भटक्या कुत्रीसोबत सेक्स करणं चांगलंच महागात पडलं आहे. न्यायालयाने या आरोपीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.  शिक्षेव्यतिरिक्त त्याला 1,050 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ठाणे महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोमवारी हा आदेश दिला असून वकिलांनी या आदेशाबाबत बोलताना म्हटलंय की अशा पद्धतीचा हा पहिलाच आदेश असावा.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात या आरोपीला अटक करण्यात आली होती.  ठाणे पोलिसांनी कुत्रीशी सेक्स करत असल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक केली होती. आरोपीचे नाव विजय चाळके असून त्याच्याविरोधात कलम 377 (अनैसर्गिक संभोग) आणि प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंध कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळकेविरोधात काही प्राणीमित्रांनी तक्रार दाखल केली होती.

सागर गुप्ता आणि त्याचे काही मित्र भटक्या कुत्र्यांना खायला घालायला बाहेर पडले होते. यावेळी त्यांना वागळे इस्टेट परिसरात असलेल्या जुन्या स्कायवॉकवर एक तरुण कुत्रीशी सेक्स करत असताना दिसला.  त्यांनी याची माहिती 100 नंबरला फोन करून पोलिसांना कळवली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतला.

विजय चाळके  (40) हा वागळे इस्टेट इथला रहिवासी आहे. तो बेरोजगार असून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते.  विजय हा घाण साफ करण्याची छोटीमोठी कामंही करत होता, मात्र त्याच्याकडे निश्चित असा रोजगार नव्हता.   न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिली असून दंडही ठोठावला आहे.  न्यायदंडाधिकारी व्ही.पी.खंदारे यांनी हा आदेश दिला असून प्राणीमित्रांनी या आदेशाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या