अवकाश संशोधनात हिंदुस्थानची भरारी; पेण, ठाण्यातील दोन विद्यार्थ्यांनी शोधले चार लघुग्रह

998

लॉकडाऊन मध्ये शाळा, कॉलेज बंद असताना पेण व ठाण्यातील दोन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास करून अवकाश भरारी घेतली आहे. पेणच्या गडब येथील प्रज्ञेश म्हात्रे व ठाणे येथील अक्षत मोहिते यानी संशोधन करून 4 नवीन उपग्रहांचा शोध लावला आहे. नासाने याची दखल घेतली असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रज्ञेश व अक्षत या दोन विद्यार्थ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यांंमध्ये नासा ह्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थकडून कडून आयोजित “इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन” ह्या मोहिमेत सहभाग घेतला होता. ह्या मोहिमेमध्ये पृथ्वीच्या जवळील ग्रह “नियर अर्थ ऑब्जेक्ट” व मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या पट्ट्यात फिरणारे लघुग्रह “मेन बेल्ट अॅस्टिरॉईड” मध्ये असलेल्या लघुग्रहांचा शोध घ्यायचा होता. त्या करीता त्यांंना अमेरिकेतील हवाई येथे स्तित असलेल्या “प्यान-स्टार्स” वेधशाळा व ऍरिझोना येथील क्यातलीना सर्व्हे या वेधशाळे मधून शोध घेण्याची संधी मिळाली. या शोधकार्यातून त्यानी 4 लघुग्रह शोधले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या