ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण

788

ठाण्यात मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या कोरोनाच्या नवीन 12 कोरोना रुग्णांच्या यादीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निकटवर्तीय असलेला हा पदाधिकारी कोरोना पाॅझिटीव्ह असल्याने पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये घबराट पसरली असून एकूणच चिंतेचे वातावरण आहे.

ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून पत्रकार, पोलीस, डॉक्टर, मंत्र्याच्या अंगरक्षका सोबत आता राजकीय पदाधिकारी ही बाधित होत आहेत. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आव्हाड यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी त्यांनी स्वतः ला होम क्वांरटाइन केले होते. मात्र आज राष्ट्रवादीचा स्थानिक पदाधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या