10 पिस्तुल-40 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक; ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुन्हेगारांना विकण्यासाठी तयार केलेला मोठा शस्त्रसाठा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने अमरावती येथून जप्त केला आहे. अमरावती येथे पथकाने केलेल्या कारवाईत 10 पिस्तुल, 40 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे ठाणे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. बेकायदा शस्त्रसाठा प्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे.