
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी श्रावणरंग या खास काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गजलकार ए.के.शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कविसंमेलनाला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, तर प्रसिद्ध गजलकार आणि ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कविसंमेलनात कवी दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, निकिता भागवत, विजयराज बोधनकर, रामदास खरे, जितेंद्र लाड आणि वृषाली विनायक हे मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे सायंकाळी 4.30 वाजता या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत असून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रसिकांनी या कविसंमेलनाला उपस्थित राहून दाद द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक आणि प्रदेश सचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले आहे.



























































