तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट गायब?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा प्राचीन मुकुट गायब असून त्या जागी दुसरा मुकुट ठेवण्यात आला आहे. तसेच देवीच्या नित्योपचारासाठीच वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती जिल्हाधिकाऱयांनी नेमलेल्या तपासणी समितीच्या
अहवालातून समोर आली आहे.