मोसादच्या ऑपरेशन ब्रदरवर आधारित द रेड सीचा ट्रेलर प्रदर्शित

60

सामना ऑनलाईन । मुंबई

इथियोपियन ज्यु साठी इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादने ऑपरेशन ब्रदर नावाची मोहीम पार पाडली होती. याच घटनेवर आधारित द रेड सी डायविंग या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

70 च्या दशकात इथिओपिया या आफ्रिकन देशात ज्युंवर अत्याचार झाले होते. त्यांना धर्म स्वातंत्र्य काढून घेऊन त्यांची घरे दारे जाळण्यात आली होती तसेच काहींना तिथून परागंदा व्हावे लागले होते. या घटनेत अडीच हजार ज्यु मारले गेले होते तर साडे सात हजार ज्यु विस्थापित झाले होते. आपल्या धर्म बांधवांना वाचवण्यासाठी इस्राएलच्या मोसादने ऑपरेश ब्रदर ही मोहीम पार पाडली होती. या मोहिमेनुसार मोसादच्या अधिकार्‍यांनी सुदानमध्ये एक रीसोर्ट बनवले होते आणि तिथे आपल्या धर्मबांधवांना ठेवले होते आणि त्यांना युरोपच्या मार्गाने इस्राएलमध्ये सुरक्षित नेले. या ऑपरेशनवरच  द रेड सी डायविंग रीसोर्ट हा चित्रपट आधारित आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो नेटफ्लिक्सवर ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या