WWE सुपरस्टार हॉल ऑफ फेम ‘द रॉक’ याचे वडील रॉकी जॉन्सन यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. रॉकने आपल्या वडिलांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात रॉकी हे रिंगमध्ये दिसत आहेत. तर रॉक प्रेक्षकांमध्ये बसलेला दिसत आहे.
या पोस्टमध्ये रॉकने एक भावुक कविताही लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘आय लव्ह यू, तुम्ही प्रत्येक बेरियर तोडले, तुम्ही माझे हिरो आहेत. मी जे आहे ते तुमच्या मुळेच, डॅड’ लोकांनी या पोस्टवर आपल्या भावना व्यक्त करत रॉकेला धीर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
रॉकी जॉन्सन देखील कुस्तीपटू होते. त्यांनी टॉनी ऍटलास याच्यासोबत सोनी पेट्रोलियमचा सदस्य म्हणून पहिले आफ्रिकन-अमेरिकन वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियन म्हणून इतिहासात नाव नोंदवले. ड्वेन जॉन्सनचे वडील रॉकी जॉन्सन यांनी त्याला ‘द रॉक’ बनवले. 1991 मध्ये रॉकीने WWE चा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी ड्वेनला प्रशिक्षण देणे सुरू केले. ते हेवीवेट जेतेपद जिंकणारे पहिला आफ्रिकन-अमेरिकन देखील होते.