पालिकेच्या इस्पितळात डॉक्टरकी करणाऱया तिघा मुन्नाभाईंना बेडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंड येथील महानगर पालिकेच्या एम. टी. अगरवाल इस्पितळातील अतिदक्षता विभागात काम करणाऱया मूळ डॉक्टरांचे नाव व रजिस्ट्रेशन क्रमांकाचा वापर करून स्वतः डॉक्टर म्हणून काम करणाऱया तिघा भामटय़ांना मुलुंड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

चंद्रशेखर यादव (32), सुरेखा चव्हाण (34) आणि सुशांत जाधव (30) अशी अटक झालेल्या तिघा बोगस डॉक्टरांची नावे आहेत. अगरवाल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात काम करणाऱया मूळ डॉक्टरांचे नाव व रजिस्ट्रेशन क्रमांकाचा वापर करून त्यांच्याऐवजी बोगस डॉक्टर काम करीत असल्याबाबतची तक्रार मुलुंड येथील 27 वे न्यायालयात दखल करण्यात आली होती.