चिपळून बसस्थानकातून एक लाख 72 हजाराचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण बसस्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने एका प्रवाशाचे एक लाख 72 हजार रुपये किमंतीचे दागिने लंपास केले. रतन सचिन बामणे (रा.गोरेगाव, मुंबई) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. चिपळूण येथून दोनवलीत जाण्यासाठी रतन बामणे बसस्थानकात आले. दोनवली गांग्राई बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या बॅगेतील एक लाख 72 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले.