चिपळूणात ट्रकमधील 3 लाखांचा माल लांबवला

398
प्रातिनिधिक फोटो

एका ट्रकमधील 3 लाख 18 हजार 960 रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना चिपळूण शहरात घडली आहे. संजय मल्हारी गुरव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ट्रकमधील 25 औषधांचे खोके आणि 3 चप्पलचे खोके अज्ञात चोरट्याने लंपास केले. ते ट्रकने हडपसरहून चिपळूणातील बँककोट्रान्स लॉलीस्टीक गोडाऊन येथे आले असता त्यांनी माल उतरवण्यासाठी ट्रकवरची ताडपत्री काढली, त्यावेळी ट्रकमधील माल गायब झाला असल्याचे निर्दनास आले.

आपली प्रतिक्रिया द्या