कार्यालय फोडून चोरट्यांचा एक लाख ९८ हजारांवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

फायनान्स ऑफीस फोडुन १ लाख ९८ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री राहुरी मल्हारवाडी रस्त्यालगत असलेल्या करपे  इस्टेट परिसरात चोरीची ही घटना घडली  आहे. या भागात ग्रामशक्ती नावाचे फायनान्स ऑफिस गेल्या ३ वर्षापासुन सुरू आहे.
शुक्रवारी मध्यरात्री ऑफीसच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवत केला. लॉकर फोडुन त्यातील सुमार १ लाख ९८ हजाराची रोकड चोरुन लॉकर पेट्या परिसरातच फेकुन दिल्या. नगर मनमाड राज्य मार्गावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसाहतीतील फायनान्स ऑफीस फुटल्याची माहिती परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

या घटनेची खबर मिळताच राहुरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरी करताना तोडण्यात आलेले कुलूप पोलिसांना घटनास्थळी सापडले नाही. तसेच कपाटाचे लॉकरला कुठेही खरचटले नसल्याचे दिसुन आल्याने चोरीच्या घटने बाबत पोलीस देखील चक्राऊन गेले आहेत. चोरीच्या तपासासाठी नगर येथुन श्वान पथकाला तसेच ठसेतज्ज्ञ पाचारण करण्यात आले होते.  फायनान्स ऑफिसच्या दरवाजाचा कडी तोडण्या पुर्वी चोरट्यांनी रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाईटवर कापड टाकुन  अंधार केला होता.   फायनन्स कंपनीचे व्यवस्थापक मारुती किसन सावळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राहुरी पोलिसांत अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शिरसाठ करीत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने फायनान्स ऑफीसच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.तसेच सुरक्षा कर्मचारी ठेवणे बंधन कारक असताना मात्र संबंधीत फायनन्स कंपनीकडुन ही दक्षता घेतली गेलेली नव्हती.