
सामना प्रतिनिधी । लातूर
अहमदपूर येथील मिरकले नगर भागातील स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी तोडून सुमारे 30 हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली. या प्रकरणी शालिनी अरविंद कदम (वय ४२, रा. रेड्डी कॉलनी अहमदपूर) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात चोरट्याने मिरकले नगर भागातील स्वामी समर्थ मंदिराचे चॅनल गेट तोडून आत प्रवेश केला. दानपेटी तोडून त्यातील 30 हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































