शिवशाही बसने प्रवास करताना 1 लाख रुपये लांबवले

शिवशाही बसमधून अहमदपूर येथून उदगीरकडे जात असताना अज्ञात चोरट्याने बॅगमधील एक लाखांची चोरी केली आहे. या चोरीप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानोबा गोंविद पाटील (रा. शेल्लाळ रोड, उदगीर) यांनी या चोरीसंदर्भात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते अहमदपूर येथून संभाजीनगर ते उदगीर या शिवशाही बसमधून उदगीरला जाण्यासाठी प्रवास करत होते. त्यांनी आपली बॅग मांडीवर ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने बॅगमधील रोख 1 लाख रुपये काढून घेतले. अज्ञात व्यक्तीविरुध्द उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक येडके करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या