देशात 43 लाख परिचारिकांची कमतरता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना रुग्णालयांमध्ये 43 लाख कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. थिंक चेंज पह्रम या थिंक टॅकने नर्सिंग क्षेत्रातील समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी देशभरातील नर्सिंग आणि सुईणींचा संवाद आयोजित करण्यात आला होता.

कोरोनाच्या आणखी एका लाटेसाठी देशातील नर्सिंगच्या पायाभूत सुविधा तयार आहेत का, या विषयावरील चर्चेत नर्सिंग संस्था, शैक्षणिक संस्था, एनजीओ सहभागी झाले. या चर्चेत परिचारिकांची स्थिती बळकट करण्यासाठी पंचसूत्री शिफारशी करण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकार स्तरावरील परिचारिकांची मंजूर पदे तत्काळ भरणे, अतिरिक्त नार्ंसग पदांची निर्मिती करणे, राष्ट्रीय परिचारिका आणि सुईणी कमिशन विधेयक मंजूर करणे, इंडिया नर्सिंग काऊन्सिल कायदा 1947 रद्द करणे, परिचारिका नोंदणी आणि ट्रकिंग प्रणालीऐवजी थेट नोंदणी पद्धत लागू करणे यावर भर देण्यात आला.

चर्चेत नर्सिंग काऊन्सिलचे अध्यक्ष डॉ. टी. दिलीपकुमार, द नार्ंसग असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. रॉय के. जॉर्ज, डॉ. बुलबुल सुद, मीडियम हेल्थ केअर कन्सल्टिंगचे संस्थापक रतन जालान सहभागी झाले.