राजस्थानमध्ये न्यायमूर्तींच्या घरी चोरी, सोनं चांदीच्या नव्हे तर त्याहून किंमती ऐवज चोरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमध्ये एका न्यायमूर्तींच्या घरी चोरी झाली आहे. परंतु हुशार चोरांनी सोने चांदी चोरण्याऐवजी घरातील किंमती चंदन चोरले आहे. या चंदनाची किंमत बाजारात कोटींच्या घरात आहेत.

कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश नेहरू गार्डनमध्ये राहत होते. त्यांच्या घरी 30 डिसेंबर रोजी चोरी झाली तेव्हा सर्व कुटुंबीय सुटी घेऊन बाहेर गेले होते. बुधवारी सुटी संपून कुटुंबीय घरी आले तेव्हा ही चोरी उघडकीस आली. या चंदनाची किंमत एक कोटी इतकी असल्याचे म्हटले जाते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरांनी घरात शिरण्यापूर्वी वीजप्रवाह खंडित केला. तसेच फोनची लाईनही कापून टाकई. त्यानंतर त्यांनी घराच्या आवारातील चंदनाचे झाद कापले आणि तिथून पोबारा केला. या चोरीत तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण झाड कापून ते घेऊन जायला कमी कमी तीन ते चार तासांचा अवधी लागतो.

चोरी झालेल्या चंदनाचे वजन तीन टन असल्याचे सांगितले जाते. या चोरीच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.