‘या’ सेलिब्रिटींची झाली आहेत शेजाऱ्यांशी भांडणे!

आपल्या आवडत्या कलाकार मंडळीच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यात प्रत्येक चाहत्याला रुची असते. मग ते कोणती फॅशन करतात, ते कुठे जातात, काय खातात या सर्व कारणांमुळे तर ते प्रकाशझोतात येतात. इतकंच नव्हे तर सेलिब्रिटी त्यांच्या भांडणामुळेही प्रसिद्ध होतात. मग ती सहकलाकारासोबत असो किंवा शेजाऱ्यांशी असो. कितीही सेलिब्रिटी म्हटले तरी तेही तुमच्या आमच्यासारखे शेजाऱ्यांशी भांडतात. पाहुयात कोणते सेलिब्रिटी आहेत ज्यांची शेजाऱ्यांशी भांडणे झाली आहेत.

करीना कपूर खान
बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपुर खानने तिचा चित्रपट ‘की अॅन्ड का’ ची स्क्रिनिंग तिच्या घरी ठेवली होती. त्यावेळी आलेल्या कलाकारांसाठी करीनाने खास पार्टीची व्यवस्था केली होती. ही पार्टी खूप उशिरापर्यंत चालल्याने त्याचा त्रास तिच्या शेजारच्यांना झाला. शेवटी पार्टी थांबवण्यासाठी शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले.

karina-kapoor-khan

आदित्य पांचोली
आदित्यच्या विरोधात शेजाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली. प्रतिक नीरज परसानी नामक शेजाऱ्याच्या पार्किंगच्या जागेवर आदित्यकडे आलेल्या पाहुण्यांनी त्यांची गाडी पार्क केली होती. ती गाडी हलवण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद होऊन आदित्यने शेजाऱ्यावर हात उचलला . या विरोधात त्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

adity-pancholi

प्रिती झिंटा
”प्रिती तिच्या सेलिब्रेटी असण्याचा गैर वापर करते, प्रिती जेव्हा सोसायटीच्या बागेत फेरफटका मारायला जाते त्यावेळी तिथे तिच्यासोबत असणारे बाउंसर्स लहान मुलांना बागेत येण्यापासून अडवून ठेवतात, अशी तक्रार 2015 साली तिच्या शेजाऱ्यांनी केली होती.

priti-zinta

रणबीर कपूर
कटरीनासोबत झालेल्या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी रणबीरने बऱ्याच पार्ट्या केल्या. ज्यात काही पार्ट्या या मोठ्या आवाजात सकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असायच्या. याचा त्रास शेजाऱ्यांना झाल्याने त्यांनी रणबीरला या प्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती.

ranbir-kapoor

राणी मुखर्जी
राणी मुखर्जीचं कुटुंब त्यांच्या सोसायटीची लिफ्ट ही फक्त स्वत:च्या मालकीची असल्याप्रमाणे वापरतात. त्यामुळे लिफ्टचा वापर सोसायटीमधील इतर सदस्य करता येत नाही, अशी तिच्या शेजाऱ्यांची तक्रार होती. या कारणामुळे शेजाऱ्यासोबत राणीचे काही वाद देखील झाले होते.

rani-mukharji

शाहीद कपूर
शाहीद कपूरच्या जुहू येथील घराच्या दुरुस्तीचे काम सुमारे दोन महिने सुरू होते. त्यावेळी येणाऱ्या आवाजाचा शेजाऱ्यांना खूप त्रास व्हायचा. तसेच घर दुरुस्तीसाठी येणारे मजूर शेजाऱ्यांच्या भिंतींवर थुंकून त्या खराब करायचे. त्यामुळे शाहिद विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली गेली होती.

shahid-kapoor

ऐश्वर्या राय
सलमान खान सोबत नात्यात असताना ऐश्वर्या लोखंडवाला येथे राहत होती. त्यावेळी ऐश्वर्या रागात दार उघडत नसल्याने सलमानने तिच्या घराबाहेर धिंगाणा घातला होता. सलमानने सतत दार वाजवूनसुद्धा ऐश्वर्याने दार उघडलं नव्हतं. या भांडणाचा त्रास शेजारील लोकांना झाल्यामुळे त्यांनी ऐश्वर्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.

aishwarya-rai

आपली प्रतिक्रिया द्या