इंटरनेट बंदमुळे देशाला हजारो कोटींचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2019 या वर्षात हिंदुस्थानाच्याअनेक भागात इंटरनेट बंद करण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे इंटरनेट बंद करण्यात आले होते. परंतु त्यामुळे कोट्यवधींची नुकसान झाल्याचे समोर आले आहे. नेट बंद करण्यात हिंदुस्थानचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्यात पहिल्या क्रमाकांवर म्यानवार तर दुसरा क्रमांक चाड या देशाचा लागतो.

2019 वर्षात अनेक घडामोडी झाल्या. त्यात कलम 370 हटवणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे कश्मीरसह इशान्येकडील राज्यात मोठ्या प्रमाणात जनक्षोभ होता. या काळात देशभरात  4 हजार 196 तास इंटरनेट बंद करण्यात आले होते. इंटरनेट बंद असल्यामुळे 9 हजार 423 कोटींचे नुकसान झाले आहे. ब्रुकलीन इन्स्टिट्युटने ही माहिती जारी केली आहे.

देशभरात सर्वाधिक जास्त कश्मीरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. 4 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवल्यामुळे इंटरनेट बंद करण्यात आले होते. अजूनही ही इंटरनेट बंदी काढण्यात आलेली नाहिये.