
सामना प्रतिनिधी । नगर
नगर शहरातील सत्ता कॉलनी भागामध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली असून त्याच्या मलब्याखाली दबून तीन मजूर ठार झाले आहेत. या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
सत्ता कॉलनीत एका घराचा बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी काही मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक निर्माणाधीन भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात रोहन विजय फुलारे(वय-२२, बुरुडगाव, ता.नगर), राहुल विजय फुलारे (वय-२६, बुरुडगाव, ता.नगर), गोविंद शंकर शिंदे (वय-३२, बुरुडगाव) हे भिंतीच्या मलब्याखाली अडकले होते. त्यानंतर तत्काळ तेथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने मलब्याखाली अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले. यात दोघांचा आधीच मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. तिसऱ्या मजूराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.






























































